‘प्लास्टिक पीक अप डे’ अभियानात कुशेवाडा ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम

0
423
वेंगुर्ला: प्लास्टीक पिक अप डे” अभियानात वेंगुर्ला पंचायत समिती गटात प्रथम क्रमांक प्राप्त कुशेवाडा ग्रामपंचायतला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्रक देवुन सभापती सुनील मोरजकर  यांच्या हस्ते गौरवण्यात आले.यावेळी उपसभापती स्मिता दामले, गटविकास अधिकारी मा.हिंदुराव नाईक साहेब, सदस्य प्रणाली बंगे, माजी सभापती यशवंत परब, सदस्य श्यामसुंदर पेडणेकर, सिद्धेश परब, मंगेश कामत, साक्षी कुबल, अनुश्री कांबळी, गौरवी मडवळ, विस्तार अधिकारी भास्कर केरवडेकर .उपस्थित होते. हा पुरस्कार कुशेवाडा सरपंच स्नेहा राऊळ,उपसरपंच निलेश सामंत, रुपेश राणे, ग्रां.प सदस्य अनुजा माडये ग्रामसेवक प्रसाद तुळसकर यांनी स्वीकारला.  कुशेवाडा ग्रा.प संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात कोकण विभागात प्रथम आली असुन राज्य स्तरावर स्पर्धेसाठी सज्ज झाली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.