लाच घेताना भूमी अभिलेखचा कर्मचारी दुसऱ्यांंदा रंगेहाथ

0
785
मालवण : सामाईक जमिनीचे आकारफोड करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तीनहजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या मालवण  येथील भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार धाकू भैरू काळे(४०, रा. परमे, मढाळवाडी, ता. दोडामार्ग) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सिंधुदुर्ग युनिटने सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास रंगेहाथ पकडले. भूमी अभिलेख कार्यालयातील निमतानदार धाकू भैरू काळे याने तक्रारदार यांच्या चुलत काकांच्यासामाईक जमिनीची आकारफोड करून त्याचा अहवाल तहसील कार्यालयाकडे पाठविण्यासाठीतक्रारदारांकडे ५ हजार  रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधकविभागाकडे 31 मार्च रोजी तक्रार केली होती. काळे याच्या विरोधात लाचलुचपतअधिनियम १९८८ चे कलम ७, १३, (१), (ड) सह कलम १३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यातआला आहे. यापूर्वी २०१२ मध्ये सावंतवाडी येथे कार्यरत असताना लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, काही वर्षांपूर्वी मालवण भूमी अभिलेख कार्यालयात एका अधिकाऱ्यावर अशाच प्रकारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती. त्यानंतर आज पुन्हा या कार्यालयात कारवाईकरण्यात आल्याने येथील कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या कारवाईत फिर्यादी असणारीव्यक्ती ही ६५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असल्याने ज्येष्ठांनाही शासकीय कार्यालयत मिळत असलेलीअन्यायकारक वागणूक यातून समोर आली आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.