मालवण शहरातील महिला व मुलांसाठी ‘भारत दर्शन’ 

0
697

मालवण – समर्थ महिला मंडळ मालवणच्या संस्थापक माजी नगरसेविका सौ स्नेहा सुदेश आचरेकर यांच्या संकल्पनेतून मालवण शहरातील महिला व मुलांसाठी ‘भारत दर्शन’ ही पर्यटन व धार्मिक सफर आयोजित केली जाणार आहे. या उपक्रमाचा नावनोंदणी शुभारंभ सोमवार ५ नोव्हेंबर सायंकाळी ४ वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध धार्मिक व पर्यटन स्थळांबरोबर भारतात अगदी जम्मूकाश्मीर ते कन्याकुमारी पर्यत विविध ठिकाणी पर्यटन सफर आयोजित केली जाणार आहे. श्री स्वामी समर्थ जन्मस्थान कर्दळीवन, आंध्रप्रदेश येथे १ जानेवारी २०१९ रोजी पहिल्या देवदर्शन सफरीने उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. अगदी नाममात्र शुल्क भरून या सफरमध्ये महिलाना सहभागी होता येणार आहे.वर्षभर विविध ठिकाणी देवदर्शन व पर्यटन सफर आयोजित करण्यात येणार असून सोमवारी या उपक्रमाचा नावनोंदणी शुभारंभ होणार आहे. तरी यावेळी महिलांनी उपस्थित रहावे असे आवाहन समर्थ महिला मंडळाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक –  स्नेहा आचरेकर मोबा ७०४५६८४४४८ व  माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर मोबा ९४२२३९४१८५ यांच्याशी संपर्क करावा.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.