ड्रोनच्या नजरेतून श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव सोहळा !

0
684

देवगड : श्री क्षेत्र कुणकेश्वर इथं दीपावली पाडव्यानिमित्त ११००० दीप पेटवून दीपोत्सव साजरा करण्यात आला. पाहूयात थेट आकाशातून कुणकेश्वर शिवतीर्थावरील हा नेत्रदीपक सोहळा.श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्यावतीने मागील वर्षीपासून दिपावली पाडव्यानिमित्त  दीपोत्सव साजरा करण्यास प्रारंभ झाला. या कालावधीत मंदिर परिसरात दिवे पेटवून दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ७००० पणत्या पेटवून हा उत्सव साजरा केला जातो, मात्र यावर्षी ११००० पणत्या पेटवून हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी देवगड-जामसंडे नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, जिल्हा परिषद सदस्या सौ. सावी लोके, नगरसेविका सौ. हर्षा ठाकूर, कुणकेश्वर सरपंच श्रुती बोंडाळे देवगड तालुक्यातील तसेच कुणकेश्वर मधील अनेक भाविक कुणकेश्वर शिवतीर्थावर दीपोत्सव सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी कुणकेश्वर शिवतीर्थावर आले होते. या सोहळ्यास उपस्थित असलेले देवगड-जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर यांचा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष किशोर पेडणेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सावी लोके, सुगम संगीत स्वरसुधा क्रिएशन प्रस्तुत दिपसंध्याच्या समीर सोमण व सहकारी यांचाही याठिकाणी सत्कार करण्यात आला. या दीपोत्सव कार्यक्रमामुळे कुणकेश्वर मंदिर परिसर लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.