सावंतवाडीत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या डे केअर सेंटरचे रविवारी उद्घाटन

0
361
सावंतवाडी : दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंदाचा दीप प्रज्वलित करण्यासाठी आणि डे केअर सेंटरची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी साहस प्रतिष्ठान सावंतवाडी, दिव्यांग पालक समिती व नवी मुंबई आरंभ फाउंडेशनच्यावतीने सावंतवाडीत १८ नोव्हेंबरला दिव्यांग विद्यार्थांची कार्यशाळा आयोजित करण्यात आलीय.या कार्यशाळेत फिजीओथेरफी टॅलेंटनुसार बालकांना आनंद मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा आणि दिव्यांग विद्यार्थ्यांची डे केअर सेंटरसाठी नोदणी करण्यात येणार आहे. ही कार्यशाळा १८ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते साय ५ या वेळेत कळसुलकर हायस्कूल सावंतवाडीच्या सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमास राज्याचे गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर, सह्याद्री फाऊडेशनचे अध्यक्ष संजू परब यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी व डे केअर सेंटरची मुहूर्तमेढ रोवण्याकरिता या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन साहस प्रतिष्ठानचे अध्यकक्षा रुपाली पाटील, आरंभ फाउंडेशन च्या संस्थापक राखी पंडित व पालक कमिटीच्यावतीने करण्यात आलाय.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.