छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतरावरून कणकवलीत वादंग

0
738
कणकवली : हायवे चौपदरीकरणात कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी महाराजांचा पुतळा बाधित होत आहे. हा पुतळा बसविण्यासाठी सध्याच्या जागे लगत बांधकामाला बुधवार पासून सुरुवात करण्यात आली होती. या जागेला शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजपा नेते संदेश पारकर यांनी आक्षेप घेत काम बंद पाडले. यावरून वैभव नाईक, संदेश पारकर आणि स्वाभिमान कार्यकर्ते यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतराचा वाद पेटलाय. हायवे अथाँरीटीकडून हा पुतळा बसविण्यासाठी सध्याच्या जागेच्या लगत बांधकामाला बुधवार पासून सुरुवात करण्यात आली होती. या जागेला शिवसेना आमदार वैभव नाईक आणि भाजपा नेते संदेश पारकर यांनी आक्षेप घेत काम बंद पाडले. यावरून स्वाभिमान कार्यकर्ते भाई परब, सुशील सावंत, वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनंतर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्वाभिमानचे  नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली.  ओव्हर ब्रिजखालील सर्कलमध्ये हायवे कायद्यानुसार कुठलाही पुतळा बसविता येत नाही. आधी शिवाजी महाराजांचा पुतळा शिवाजी चौकातच बसविणार नंतर हायवेचे काम होणार असे नलावडे यांनी ठणकावुन सांगितले. भविष्यात शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर वाद मिटला नाही तर कणकवलीत पुन्हा एकदा राजकीय राडेबाजी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.