सावंतवाडीत CM चषक क्रीडा महोत्सव २०१८ स्पर्धेच आयोजन

0
1153

सावंतवाडी : सर्वाना आतुरता असलेल्या CM चषक क्रीडा महोत्सवाच २०१८ सावंतवाडी स्पर्धा वेळापत्रक जाहीर झाल आहे. या स्पर्धेमध्ये सांघिक तसेच वैयक्तिक स्पर्धा घेण्यात येणार आहेत.२ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी ९ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन जिमखाना मैदान येथे होवून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. २ डिसेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत अनेक खेळांची मांदियाळी पाहता येणार आहे. उड्डाण १०० मिटर धावणे स्पर्धा, मुद्रा योजना ४०० मिटर धावणे स्पर्धा, जलयुक्त शिवार व्हॉलीबाॅल या स्पर्धा २ डिसेंबर रोजी जिमखाना मैदान येथे सकाळी १० वाजता होणार सुरु. आयुष्मान भारत क्रिकेट स्पर्धा या 7 डिसेंबर ते ९ डिसेंबर असे तीन दिवस जिमखाना मैदान येथे सकाळी १० वाजता होणार सुरु. शेतकरी सन्मान कब्बडी स्पर्धा आर.पी.डी. हायस्कूल मैदान सावंतवाडी येथे सायंकाळी ४ वाजता, तर मेक इन इंडिया रांगोळी स्पर्धा ९ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी येथे सकाळी १० वाजता,इंद्रधनुष्य चित्रकला स्पर्धा या ११ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता ते ११:३० वाजेपर्यंत कै. जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी येथे, समई नृत्य व चपई नृत्य १५ डिसेंबर सायंकाळी ४ वाजता कै. जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी येथे तर या स्पर्धेची सांगता त्याच दिवशी उजाला गायन स्पर्धा व उज्वला नृत्य स्पर्धेने सायंकाळी ५ वाजता कै. जगन्नाथ भोसले उद्यान सावंतवाडी येथे होणार आहे. जनहितासाठी भाजप सरकार हे नेहमीच कटिबंध राहणार आहे. तालुक्यातील लोकांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी या स्पर्धेत सहभाग घेवून हि स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी तालुकावासीयांना केल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here