वैज्ञानिक दृष्टीकोन मुलांच्या अंगी भिनला पाहिजे, फक्त वार्षिक कार्यक्रम नको : जयप्रकाश परब

0
495

देवगड : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनास १०० विज्ञान प्रतिकृती येणे अपेक्षित असताना पन्नास पेक्षा कमी प्रतिकृती येणे चिंताजनक असल्याची खंत, देवगड गटविकास अधिकारी प्रकाश परब यांनी व्यक्त केली. देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे सभापती जयश्री आडीवरेकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. देवगड पंचायत समिती शिक्षण विभाग व ज्ञानसंपदा जुनियर कॉलेज तळवडे यांच्यावतीने देवगड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात सहभागी झालेल्या शाळांनी आपल्या विज्ञान प्रतिकृती प्रदर्शनासाठी ठेवल्या होत्या. गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी तालुक्यात २१८ प्राथमिक व माध्यमिक शाळा असताना, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात किमान १०० विज्ञान प्रतिकृती येणे अपेक्षित असताना ५०पेक्षा कमी प्रतिकृती येणे खेदजनक असल्याचे म्हटले. मुलांनी   वैज्ञानिक दृष्टीकोन जपून,  विज्ञानाची विध्वंसक मानसिकता नष्ट करून विधायक कामासाठी विज्ञानाचा उपयोग केला पाहिजे असे जयप्रकाश परब यांनी सांगितले. यावेळी राकणेश्वर देवालय ट्रस्ट व ज्ञानसंपदा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने सभापती जयश्री आडिवरेकर व गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी संस्थेचे अध्यक्ष जगदीश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर,  माजी सभापती सदानंद देसाई, मुख्याध्यापक स्वप्नील पातडे, मुख्याध्यापक एस. एस. पाटील, सरपंच गणेश लाड, पंकज दुखंडे, विनायक आचरेकर, राजेंद्र म्हापसेकर गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते.
 
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here