अपघात प्रकरणी रमेश चव्हाण यांची निर्दोष मुक्तता 

0
382
वैभववाडी : इको कार आणि दुचाकी अपघात प्रकरणी रमेश चव्हाण यांची वैभववाडी ग्राम न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस. ए. जमादार यांनी निर्दोष मुक्तता केलीय. २०१७ मध्ये इको कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला होता.
रमेश चव्हाण हे आपली इको कार घेवुन वैभववाडीवरुन खांबाळे च्या दिशेने जात होते. अनिल तांबे, शिवराम तांबे दुचाकीवरुन लोरे वैभववाडीच्या दिशेने जात होते. यांच्यात खांबाळे दंड येथे अपघात झाला. या अपघातात अनिल, शिवराम हे जखमी झाले. जखमीना कोल्हापुर येथे उपचारासाठी दाखल करण्यात करण्यात आले. या प्रकरणी रमेश चव्हाण यांच्यावर भादवि कलम २७९, ३३७,३३८, ४२७, १८४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी वैभववाडी ग्राम न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस.ए. जमादार यांनी रमेश चव्हाण यांची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी आरोपीच्या बाजुने वकील प्रदिप रावराणे यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here