खा. विनायक राऊत यांच्या हस्ते वैभववाडीत विविध विकासकामांचा शुभारंभ

0
592
 वैभववाडी : वैभववाडी तालुक्यात खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते विविध विकास कामांचा शुभारंभ झाला.यावेळी विकासाकरिता निधी अपुरा पडु देणार नाही अस आश्वासन खासदार राऊत यांनी ग्रामस्थांना दिले. खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून वैभववाडी तालुक्यात झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ शुक्रवारी झाला. नाधवडे व सांगुळवाडी येथे उभारण्यात आलेल्या बीएसएनएल मोबाईल टॉवरचा शुभारंभ खासदार राऊत यांच्या हस्ते झाला. त्याचबरोबर नावळे सडुरे कुर्ली घोणसरी या रस्त्याच्या नुतनीकरण कामाचे भुमीपुजन खासदार राऊत यांनी केले. तसेच सांगुळवाडी मधील बौद्धवाडी व खालचीवाडी येथील  स्ट्रीट लाईटचा शुभारंभ  खासदार राऊत यांनी केला. वैभववाडी तालुक्यातील नावळे, सडुरे, कुर्ली व कुंभवडे येथे लवकरच बीएसएनएल टॉवर कार्यान्वित करणार अस आश्वासन खासदार राऊत यांनी दिले. वैभववाडी तालुक्यातील विकास कामासांठी निधीची केव्हाच कमतरता भासू देणार नाही. लोकप्रतिनिधीनी जनतेच्या समस्यांचा प्रामाणिकपणे पाठपुरावा केल्यास, विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अस मत खासदार राऊत यांनी व्यक्त यावेळी केल.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.