राज ठाकरेंच्या ‘त्या’ भाषणानंतर युपी, बिहारमधील नेत्यांना महाराष्ट्रात प्रवेशबंदी

0
436

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर उत्तर प्रदेश, बिहारमधील नेत्यांना मुंबई आणि महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उत्तर भारतीय महापंचायत समितीने हा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत रोजगार देत नाही तोपर्यंत नेत्यांना प्रवेश करु देणार नाही अशी घोषणा त्यांनी केली आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय महापंचायत समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत भाषण केलं आणि आपली बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी उत्तर प्रदेश, बिहारमध्ये रोजगार उपलब्ध न होण्याला तेथील नेते जबाबदार असल्याची टीका केली. उत्तर भारतीय महापंचायत समितीने जाहीर केल्यानुसार, जोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये रोजगार आणि उद्योगधंदे उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कोणत्याही आमदार आणि खासदाराला मुंबई, महाराष्ट्रात प्रवेश करु देणार नाही. आमच्या लोकांना येथे येऊन अपमान सहन करावा लागतो. त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी हा निर्णय घेत आहोत. जर अन्य राज्यातून गुन्हेगार येथे येणार असतील तर राज ठाकरे अजिबात सहन करणार नाही. बाहेरचे टॅक्सीवाले आमच्या आयाबहिणींची छेड काढतात, मग आम्ही गप्प बसायचे का ? आमच्या आया बहिणी उघड्यावर पडलेल्या नाहीत अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना त्यांच्याच मंचावरुन सुनावलं. राज ठाकरे यांनी हिंदीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितल की, फक्त तुमचा प्रश्न असता तर मराठीत बोललो असतो. पण हे भाषण उत्तर प्रदेश, बिहारमधील लोक पाहणार आहेत अस सांगितल्याने हिंदीत बोलत आहे. उत्तर प्रदेशमधील लोकांमध्ये काही गैरसमज आहेत, काही आंदोलनं झाली, मारहाण झाली यावर काही प्रश्न आहेत. तुम्ही येऊन त्यांच्याशी बोललात तर बरं होईल अशी विनंती केल्यानेच मी आमंत्रण स्विकारल्याचा खुलासा त्यांनी केला.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.