एक तरी पत्रकार परिषद घ्या, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या, राहुल गांधी यांचा मोदींना चिमटा.!

0
500
नवी दिल्ली : पंतप्रधानपदाचा कार्यकाल जवळ जवळ संपत आला आहे. तरीही मोदिंंनी अजून एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हाच मुद्दा पकडून राहुल गांधी यांनी मोदींना टार्गेट केलयंं. ‘मोदीजी, तुम्हाला पंतप्रधान होऊन १६५४ दिवस झाले आहेत. तरीही तुम्ही एकही पत्रकार परिषद घेतली नाही. एक तरी पत्रकार परिषद घ्या.’ आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे द्या. असं आव्हान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केलं आहे. ‘पत्रकार परिषदेत पत्रकार प्रश्नांचा पाऊस पाडतात, त्याचा आनंदही मोदींनी लुटायला हवा,’ असा चिमटाही राहुल यांनी काढला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर एक ट्विट करून मोदींना हे आव्हान दिलं आहे. ‘आता निवडणूक प्रचार संपला आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून तुम्ही तुमच्या पार्ट टाईम जॉबसाठी थोडा वेळ काढाल अशी आशा आहे. तुम्हाला पंतप्रधान होऊन १६५४ दिवस झाले आहेत. तरीही तुम्ही एकही पत्रकार परिषद घेतली नाही. हैदराबादमधील पत्रकार परिषदेतील काही फोटो शेअर करतोय. कधी तरी पत्रकार परिषद घ्याच आणि पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांचा आनंद लुटाच,’ असा टोला राहुल यांनी लगावला आहे. दरम्यान, ट्विट करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर जोरदार टीका केली.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.