सावंतवाडी मोती तलावात तरुणाची आत्महत्या

0
1267
सावंतवाडी : सावंतवाडी मोती तलावात सायंकाळी एका तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. त्याला उडी मारताना एका तरुणीने पाहिले असून स्वतः उडी मारल्याची माहीती तिने दिली. स्वाभिमान तालुका अध्यक्ष संजू परब यांनी पोलिसांना संपर्क केल्यानंतर सुनील केळुसकर व नगरपालिका कर्मचारी बांदेकर यांनी दोरीच्या साहाय्याने त्याला बाहेर काढत पुढील तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल  केल्यानतर तरुणास मृत घोषित करण्यात आले.  उडी घेतलेल्या या तरुणाची ओळख पटली असून दिगंबर शांताराम राऊळ असे नाव  असून सावंतवाडी खासकीलवाडा परीसरात राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दिगंबर हा रंगकाम करून  कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.