पारपोली परिसरात वादळी पावसाने लाखोंचे नुकसान

0
738
सावंतवाडी : सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या दाणोली, देवसू व पारपोली परिसराला शुक्रवारी संध्याकाळी वादळी पावासने झोडपले. या वादळी पावसामुळे परिसरातील लोकांचे सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीची बातमी कळताच स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, माजीसभापती रवी माडगावकर यांनी घटनास्थळी जात नुकसानीची पाहणी केली. पारपोली परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आलेल्या वादळी पावसाने अनेकांचे नुकसान केले. यामध्ये सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झालंय. अनेकांच्या घरावर वृक्ष उन्मळून पडले. स्थानिकांनी तातडीने मदत कार्यास सुरवात केली. यामध्ये विलास नाईक, विजय सावंत, गंगावती गुरव, प्रमोद परब, लक्ष्मी गुरव यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, यामुळे संपूर्ण पारपोली गाव अंधारात सापडले आहे. याबबतची बातमी कळताच साभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, माजी सभापती रवी मडगावकर यांनी तात्काळ घटनास्थळी जात, झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही दिले. दरम्यान, आंबोली येथे बुधवारी झालेला डंपर अपघातही वादळी पावसामुळे झाला असल्याचे बोलले जाते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.