कुडाळ तालुकास्तरीय व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे अतुल काळसेकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
416
कुडाळ : माणगाव तिठा येथे सीएम चषकाच्या कुडाळ तालुकास्तरीय पासींग व्हॉलिबॉल स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर  यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत ३४ संघानी सहभाग घेतला होता. पासिंग बॉल, हॉलीबॉल स्पर्धेत दोन वेळा चेंडू उडवावा लागतो.आणि यानंतरच जोरदार शॉट मारावा लागतो. याच पद्धतीने महाराष्ट्रात होणाऱ्या ७२  हजार कर्मचाऱ्यांच्या मेगा भरतीचा  चेंडू उडवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे आणि तो शॉट मारण्याची जबाबदारी अर्थात  नोकरी मिळवण्याची जबाबदारी तुमची आहे ही संधी दवडू नका हा एकच शॉट मारून नोकरीमध्ये यश मिळण्यासाठी जोरदार प्रयत्न करा असे आवाहन सिंधुदुर्गचे भाजपचे  माजी जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे  संचालक अतुल काळसेकर यांनी केले.यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाई सावंत भाजपचे, माजी नगराध्यक्ष संदेश पारकर, प्रभाकर सावंत, दादा बेळणेकर, योगेश बेळणेकर,आबा केसरकर, कौशल कुडतरकर  उपस्थित होते
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.