स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकाने बेकायदा दारू वाहतूक पकडली

0
322

बांदा : विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची चोरट्या पध्दतीने वाहतूक करणाऱ्या मोटारीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा-सटमटवाडी येथे कारवाई करत ८६ हजार ४०० रुपये किमतीच्या दारुसह एकूण १ लाख ६१ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक अजय सूर्यकांत कवठणकर (वय १९, रा. ओटवणे) याचेवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई रविवारी रात्री उशिरा करण्यात आली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्ष अखेर असल्याने गोव्यातून महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होत असते. यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याच्या पथकाने महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र-गोवा राज्यांच्या सीमेवर महामार्गावर सापळा रचला होता. गोव्यातून बांद्याच्या दिशेने येणारी झेन मोटार (एमएच ०२ एलए ६५०५) थांबविण्यात आली. मोटारीच्या मागील डिकीची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे मोठ्या प्रमाणात बेकायदा खोके आढळले. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. या कारवाईची बांदा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधीर सावंत, हवालदार आशिष गंगावणे, पोलीस नाईक मनोज राऊत, अनिल धुरी, प्रवीण वालावलकर यांच्या पथकाने केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here