राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली यांच्यात बुधवारी लढत

0
458

जयपूर : अकराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर बुधवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली डेअरडेव्हील्स यांच्यात सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमविले असल्याने त्यांच्यात पहिल्या विजयासाठी चुरस राहिल. किंग्ज ईलेव्हन पंजाब संघाकडून दिल्ली संघाला पहिल्या सामन्यात मोहालीत ६ गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. पंजाब संघातील के. एल. राहुलने नोंदविलेल्या जलद अर्धशतकामुळे दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी हैदराबादमध्ये झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ९ गडय़ांनी दणदणीत पराभव करून विजयी सलामी दिली. दिल्ली आणि राजस्थान या दोन संघामध्ये बुधवारच्या सामन्यात विजयासाठी चुरस राहिल. हा सामना घरच्या मैदानावर होत असल्याने राजस्थानला त्याचा अधिक लाभ मिळू शकेल. राजस्थान संघाचे नेतृत्त्व अजिंक्य रहाणेकडे असून गंभीर दिल्लीचा कर्णधार आहे. राजस्थान संघातील स्टोक्सला पहिल्या सामन्यात सूर गवसला नाही. या संघातील संज्यू सॅमसनने पहिल्या सामन्यात ४९ धावा जमवल्या पण इतर फलंदाजांनी निराशा केली. पहिल्या सामन्यात दिल्ली संघाची कामगिरी चांगली होऊनही राहुलच्या जलद अर्धशतकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. कर्णधार गंभीरने पहिल्या सामन्यात ५५ धावा जमविल्या होत्या. या संघाकडे बोल्ट, मॉरिस, शमी आणि मिश्रा हे अनुभवी गोलंदाज आहेत. सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला अनुकूल ठरेल असा अंदाज आहे. या खेळपट्टीवर २०० धावांचा टप्पा गाठणऱ्या संघाला विजयाची अधिक संधी राहिल.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here