मोदींनी सुरू केलेली CM चषकाची चळवळ मुख्यमंत्री पुढे नेत आहेत : माधव भंडारी

0
493
देवगड : मोदींनी गुजरातमध्ये सुरु केलेली CM चषकाची चळवळ मुख्यमंत्री पुढे नेत आहेत. असे गौरोद्गार भाजपचे राज्य प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी काढले. यावेळी देवगड तालुकास्तरीय सीएम चषक क्रीडा स्पर्धेतील विजेत्या संघाना माधव भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. सीएम चषक आयुष्यमान क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जि. प. पुरळ गट विजेता तर गजानन केरपोई संघ उपविजेता ठरला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या क्रिकेट सामन्यात काळभैरव हिंदळे विरुद्ध झालेल्या सामन्यात ड्रीम गर्ल देवगड संघ विजयी झाला. या स्पर्धेत तालुक्यातील ६० संघानी सहभाग घेतला होता. विजेत्या संघाला ११,००० रुपये रोख व प्रशस्तीपत्रक  तर उपविजेत्या संघास ७००० रुपये  प्रशस्तीपत्र व चषक देऊन, माधव भंडारी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अजित गोगटे, अतुल रावराणे, संदेश पारकर, जयदेव कदम , अवधूत मालंडकर, सरपंच सायली मिठबावकर, उपसरपंच मुकेश गुरव, निलेश नार्वेकर, पूर्वा तावडे,  युवा मोर्चा अध्यक्ष बाबा आम्लोसकर , पं. स. सदस्य रवी तिर्लोटकर आदी उपस्थित होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.