सीएम चषक स्पर्धेची वैभववाडीत सांगता; स्पर्धेला लाभला उत्तम प्रतिसाद

0
553
वैभववाडी : भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने आयोजित केलेल्या सीएम चषक स्पर्धेची वैभववाडीत सांगता झाली.पंधरा दिवस  रंगलेल्या या स्पर्धामुळे तालुक्यात क्रीडा माहोल तयार झाला होता.या तालुकास्तरीय स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्हाईस -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून यावर्षी राज्यात सीएम चषक स्पर्धांच आयोजन करण्यात आल होत.सर्वत्रच या स्पर्धाना उत्तम प्रतिसाद लाभला.वैभववाडी तालुक्यात तालुकास्तरीय झालेल्या स्पर्धेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. या सीएम चषकाचे उद्घाटन २ डिसेंबर रोजी भाजपा नेते अतुल रावराणे यांच्या हस्ते उंबर्डे येथे झाले.या चषकात एकुण आठ स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.त्यातील व्हॉलीबॉल स्पर्धेत मुलांच्या व मुलींच्या गटात रासाई आचिर्णे येथील संघाने बाजी मारली.ही स्पर्धा उंबर्डे येथील गांगेश्वर मैदानावर रंगली होती. दोन्ही गटाचे मिळून ३८ संघ यात सहभागी झाले होते. क्रिकेट स्पर्धेला देखील चांगला प्रतिसाद लाभला.दोन्ही गटाचे मिळून ५५ संघ सहभागी झाले होते. वेलकम बांधवाडी या स्पर्धेचा विजेता तर रामेश्वर करुळ संघ उपविजेता ठरला.मुलींच्या गटामध्ये माधवराव पवार विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात पराभवाची धुळ चारत सीएम चषकावर आपले नाव कोरले.उड्डाण धावणे स्पर्धेतही तालुक्यातून स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.१०० मी धावणे (मुली )साक्षी संदीप लिंगायत (प्रथम),तनुजा तुकाराम झोरे  (द्वीतीय),धम्मिका प्रकाश  जाधव (तृतीय) मुलांमध्ये प्रथमेश परशुराम शेलार(प्रथम),इंद्रजीत दादासो समई (द्वितीय),अब्दुल फकीर ठाणगे(तृतीय)४०० मीटर धावणे मुली तनुजा तुकाराम झोरे (प्रथम),केतकी संदीप खाडे (द्वितीय)सायली पांडुरंग शेळके(तृतीय) मुलांमध्ये अक्षय सुनिल मोपेरकर (प्रथम)प्रथमेश परशुराम शेलार (द्वितीय)इंद्रजित दादासो समई( तृतीय) या स्पर्धकांनी बाजी मारली.कबड्डी स्पर्धेतही तालुक्यातील संघ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुरुष गटात गणेश नगर वैभववाडी संघ विजेता तर पंचायत समिती कर्मचारी संघ उपविजेता ठरला.महीलामध्ये आनंदीबाई रावराणे विजेता तर छत्रपती विद्यामंदिर नेर्ले उपविजेता ठरले.चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम सुबोध प्रितेश यादव,द्वीतीय किरण प्रकाश नारकर ,तृतीय मंदार सदाशिव चोरगे तर रांगोळी मध्ये मंगेश सिताराम तांबे प्रथम,तेजस्वी संतोष रावराणे द्वितीय, मिनाक्षी नारायण बंदरकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.नृत्य स्पर्धेत नागवेकर रॉक स्टार प्रथम,अभिनव विद्यामंदीर सोनाळी द्वितीय, शायनिंग स्टार सोनाळी तृतीय व सोलो डान्स प्रथम कविता सुतार, द्वितीय रसिक कदम तर वेदीका कदम तृतीय आली. गायन स्पर्धेत दर्जेदार स्पर्धक सहभागी झाले होते.या स्पर्धेत रेवती खांबल व अनिकेत कुलकर्णी प्रथम,द्वितीय संकेत कांबळे, श्रेयस कांबळे तर सुशांत सांगवेकर यांना तृतीय क्रमांक मिळाला.सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.या स्पर्धेला राज्य पुनर्वसन व पुर्नस्थापना सनियंत्रण समिती उपाध्यक्ष माधव भांडारी,भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रमोद जठार, भाजपा नेते संदेश पारकर यांनी स्पर्धेला उपस्थिती लावली होती. या स्पर्धेचे वैभववाडी भाजपच्यावतीने नीटनेटके नियोजन केले होते.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.