राणेंवर टीका नको, मुख्यमंत्री फडणवीस यांची जठरांना समज..!

0
722
मुंबई : राणे यांनी भाजपवर टीका करण्याआधी खासदारकी सोडावी, अशी टीका जठार यांनी केली होती. राणे यांचा स्वाभिमान पक्ष आणि शिवसेना हे भाजपचे मित्रपक्ष असले तरी सातत्याने भाजपच्या चुकीच्या धोरणांवर टीका करत आहेत. राणेंना खासदारकी सोडा सांगणारे त्याच न्यायाने शिवसेनेला सत्ता सोडायला का सांगत नाहीत, असा प्रश्न सोशल मीडियातून उपस्थित केला जात आहे. राणे हे भाजप कोट्यातून खासदार असले तरी त्यांचा स्वाभिमान हा स्वतंत्र पक्ष आहे. मध्यप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छोट्या पक्षांचे महत्व वाढले असल्याने मुख्यमंत्री फडणवीस सर्वांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात आहेत. महाराष्ट्राच्या अनेक भागात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बऱ्यापैकी ताकद आहे. मराठा आरक्षणासाठी महत्वपूर्ण योगदान असलेले नारायण राणे असतील किंवा आमदार नितेश राणे यांच्याबद्दल महाराष्ट्रात सत्तेचं गणित ठरवणाऱ्या मराठा समाजात सहानुभूती आणि आदराचे स्थान आहे. अशा परिस्थितीत राणे याना दुखावणे भाजपच्या हिताचे नाही. ३ राज्यातील पराभवानंतर भाजप सावध झाला असून सर्व मित्रपक्षांना सोबत ठेवण्याची कसरत भाजपला करावी लागत आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.