चला सर्जाला मदत करूया…

0
558

मालवण : नियती नेहमी चांगल्या माणसांना हेरून त्यांना का संकटात टाकते हा कधी कधी प्रश्न पडतो. मालवण येथील स. का. पाटील महाविद्यालयातील कला शाखेतील कु. सर्जा खरात या २२ वर्षीय गुणवंत अशा विद्यार्थ्याला कॅन्सर या गंभीर आजाराने जखडले आहे. आतड्यात गाठी झाल्या असून त्यावर दोन ऑपरेशन झाली आहेत. सध्या तो कोल्हापूर CPR हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या होतकरू विद्यार्थ्याला ऐन तारुण्यात गंभीर आजाराने ग्रासल्याने शिक्षक, विद्यार्थी, मित्रपरिवार अशा सर्वांनाच धक्का बसला असून सर्जाला यातून बाहेर काढण्यासाठी येणारा लाखोंचा खर्च कसा करायचा हा यक्ष प्रश्न त्याच्या कुटुंबियांसमोर उभा ठाकला आहे.सर्जा खरात हा एका गरीब कुटुंबातून आहे. कॉलेज मध्ये एक हुशार, होतकरू, प्रामाणिक, शिस्तबद्ध व प्रत्येक उपक्रमात पुढे असणारा उत्साही गुणवंत विद्यार्थी म्हणून सर्वांमध्ये सर्जाचा नावलौकिक आहे. एक उत्कृष्ट एनसीसी कॅडेट म्हणूनही त्याची ओळख आहे. चांगले वर्तन, मनमिळावू आणि सगळ्या कामात मदत करण्याच्या स्वभावामुळे शिक्षकांसह विद्यार्थी व मित्रपरिवारातही सर्जा सुपरिचित व लाडका आहे. कॉलेजचे प्रा. एम. आर. खोत सर, प्रा. सुमेधा नाईक मॅडम यांच्यासह कॉलेजचे सर्व शिक्षक सर्जाच्या मेहनतीच्या आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करत असतात.त्याच्या घरी आई, मोठा भाऊ, वहिनी असा परिवार असून मोठा भाऊ पांडुरंग हे कष्टाची, मोलमजुरीची कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत सर्जा याला गंभीर आजाराने ग्रासल्याने कुटुंबावर मोठे संकट ओढावले आहे. सर्जा याच्या उपचारासाठी आतापर्यंत जवळपास अडीच लाख रुपये खर्च झाले आहेत. पुढील शस्त्रक्रिया व इतर उपचार यासाठी सुमारे ७ ते ८ लाख खर्च अपेक्षित आहे. सर्जा याला आजारातून बरा होण्यासाठी लागणारा खर्च उचलण्यासाठी खरात कुटुंबियांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे.जीवनात काहीतरी करू पाहण्याच्या उद्देशाने आपली नेहमीच छाप सोडणाऱ्या या युवकावर नियतीने मात्र वक्र दृष्टी फिरवली असून ऐन तारुण्यात, उमेदीच्या काळात कॅन्सर सारख्या गंभीर आजाराने सर्जाला जखडले आहे. एनसीसीचा विद्यार्थी असणारा सर्जा या गंभीर आजारातही आपले ‘फायटिंग स्पिरिट’ कायम ठेवून या आजाराशी झुंज देत आहे. यामध्ये त्याला आपल्या सर्वांच्या आधाराची आणि मदतीची गरज आहे. तरी सर्जावर ओढवलेल्या संकटातून त्याला बाहेर काढण्यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन स्वेच्छेने शक्य ती आर्थिक मदत करावी अशी नम्र विनंती आहे. आपली छोटीशी मदतही सर्जाला नवे आयुष्य देऊ शकते !

इच्छुकांनी खालील बँक अकाउंट मध्ये आपली मदत जमा करावी.

नाव- सर्जा काळाप्पा खरात
Account No.- 60252347006
IFSC Code :- MAHB0000072
Bank of Maraharshtra, Malvan

किंवा- स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्रा. एम. आर. खोत (9168431384, 8766844244, 8623872592) यांच्याशी संपर्क साधावा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.