ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे जिल्हास्तरीय पुरस्कारांसाठी आवाहन 

0
319
सावंतवाडी : सावंतवाडी येथील ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळातर्फे प्रतिवर्षी जिल्हास्तरावर उपक्रमशील व्यक्तींना विविध क्षेत्रात समाजभिमुख कार्य केल्याबद्दल जिल्हास्तरावरील मानाचा समजला जाणारा ज्ञानदीप पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यासाठी मंडळातर्फे  प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंडळाच्या उपक्रमात जिल्ह्यातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, संगीत, क्रीडा, साहित्य व इतर क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना २७ जानेवारीपर्यंत स्वत:च्या कार्याच्या माहितीचा प्रस्ताव फोटोसह मंडळाचे संस्थापक वाय.पी.नाईक, कोहिनूर हाउसिंग सोसायटी, जुना बाजार सावंतवाडी या पत्त्यावर पाठवावेत असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष जावेद शेख यांनी केले आहे. पुरस्काराचे यंदा सलग तेरावे वर्ष आहे.आर. व्ही. नारकर, सतीश राऊळ यांनी हे पुरस्कार पुरस्कृत केले आहे. अधिक माहितीसाठी संस्थापक वाय. पी. नाईक (७७०९११२१६२) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळाने केल आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here