थरार ताडोबा जंगल सफारीचा…! ; निसर्गसोबती आणि सिंधुदुर्ग लाईव्हचे आयोजन 

0
539

सिंधुदुर्ग : ताडोबा व्याघ्र अभयारण्य हे महाराष्ट्रातील सर्वात जुने व सर्वात मोठे अभयारण्य आहे. भारतातील अभयारण्यांमध्ये त्याचा ४१वा क्रमांक लागतो. ताडोबा नॅशनल पार्क ( ११६.५५ चौ. कि.मी. ) आणि अंधारी वन्यजीव अभयारण्य ( ५०८.८५ चौ. कि.मी.) असे एकूण ६२४.४० चौ.कि.मी. परिसरात  चंद्रपूर  जिल्ह्यात  ताडोबा-अंधारी राष्ट्रीय उद्यान आहे. बांबू ( गवत ), साग, मोह, अर्जुन, तेंदू, बेहडा, जांभूळ, अशा अनेक प्रकारच्या वृक्षांनी समृद्ध असे हे जंगल आहे. १९९५ मध्ये ताडोबा हे संरक्षीत व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित केले गेले. ताडोबा हे ‘Land of the Tiger’ म्हणून ओळखले जाते.ताडोबा अभयारण्यातील मोठ्या प्रमाणात वन्यजीव विविधता आढळते. या अभयारण्यात ४५ प्रकारचे सस्तन प्राणी ( Mammals ); २८० प्रकारचे पक्षी (Birds) ; ९४ प्रकारची फुलपाखरे (Butterflyes) ; २६ प्रकारचे कोळी (Spider) आणि ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी (Reptites) आढळतात. खरतर परीक्षांचा कालावधी संपल्यानंतर पालकांसह मुलांना वेध लागतात ते फिरायचे, त्यात विशेषतः मुलांसाठी आकर्षण असते ते म्हणजे जंगल सफारीच. जंगल सफारीचा हा थरार मुलांना घेता यावा यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह आणि निसर्गसोबतीने आयोजन केले आहे. १० ते २० वर्षे या वयोगटातील मुला-मुलींसाठी  ताडोबा जंगल सफर आयोजित करण्यात आली आहे.  ५ ते ९ मे या कालावधीत ही जंगल सफर होणार आहे. मुंबई – ताडोबा – मुंबई असा १९,५०० खर्च अपेक्षित आहे. यात मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई असा रेल्वेने थ्री टायर एसीने प्रवास होणार आहे. ताडोबा येथे २ रात्र, ३ दिवस असा मुक्काम होणार आहे. यात ४ जंगल सफारींचा समावेश करण्यात आला आहे. तसेच राहण्यापासून चहा, नाष्टा, भोजनाची व्यवस्था जंगल सफरीच्या एकून पॅकेजमधून होणार आहे. एवढ्यातच जंगल सफरीचे वेध मुला -मुलींना लागले आहेत. त्यामुळे या जंगल सफरीचे बुकिंग सुरु झाले आहे. चला तर मग… या जंगल सफारीचा थरार अनुभवण्यासाठी सिंधुदुर्ग लाईव्ह्च्या ९४०४९४०१९१ या मोबाईल नंबरवर तर ०२३६३ – २७२ १९१ या दूरध्वनी नंबरवर तसेच निसर्गसोबतिच्या  ९९३०५६१६६७ या मोबाईल नंबरवर संपर्क करा.   मोजक्या जागा उपलब्ध असल्यामुळं या जंगल सफरीसाठी तातडीने बुकिंग करण्याचं आवाहन सिंधुदुर्ग लाईव्ह आणि निसर्गसोबतीच्यावतीने करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here