जे.बी.नाईक कॉलेजच्या क्रिकेट सामन्यांना शानदार सुरुवात ; विद्यार्थ्यांचा तुफान प्रतिसाद !

0
709

सावंतवाडी : सावंतवाडी येथील डॉ. जे.बी. नाईक आर्टस ॲण्ड कॉमर्स कॉलेज यांच्यावतीने मंगळवारी महाविद्यालयीन विद्यार्थी – विद्यार्थिनींचे भव्य क्रिकेट सामने सावंतवाडी जिमखाना मैदानं इथ भरवले होते. सकाळी प्राचार्या स्मिता ठाकूर यांच्याहस्ते या सामन्यांचा शानदार शुभारंभ करण्यात आला. क्रिकेट स्पर्धेत मुलांच्याबरोबरीने मुलींनी देखील घेतलेला सहभाग लक्षणीय ठरला. प्राचार्या ठाकूर यांनी यासाठी मुलींचे विशेष कौतुक केले. या सामन्यांची सुरुवात विद्यार्थ्यांनीच्या सामन्यानं झाली.यावेळी सामन्यातील षटकार,चौकारांचा पाऊस यासह भेदक गोलंदाजी पाहण्यासाठी क्रिकेट रसिकांनी केलेल्या गर्दीने जिमखाना मैदान हाऊसफुल्ल झाले होते. याप्रसंगी  महाविद्यालयाकडूनं मैदान उपलब्ध करून दिल्याबद्दल  सावंतवाडी नगरपरिषद व नगराध्यक्ष साळगावकर यांचे आभार मानण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी ऋतुराज तळवणेकर, प्रथमेश राऊळ, विघ्नेश पेडणेकर, अबरार शेख, किरण परीट, तुषार घोगळे, आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी प्रा. जोसेफ डिसिल्व्हा, प्रा. सरदार,  प्रा.डंबे, प्रा.जाधव, प्रा.वेजरे, प्रा.वाळके, प्रा.साळुंखे, विनय वाडकर आदी प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.