दिलीप बिल्डकाॅॅनचा भोंगळ कारभार : भंगसाळ नदी झाली गढूळ

0
503
 कुडाळ : कुडाळ भंगसाळ नदीवरील पुलाचे काम सुरु आहे. यावेळी दिलीप बिल्डकाॅॅने नदीत बंधारा घातला होता . याची माती वाहून गेल्याने नदीचे पाणी गढूळ झाले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम दिलीप बिल्डकाॅॅन करत आहे. भंगसाळ नदीवरील पुलाचे काम करत असताना बाजूला टाकलेली माती नदीत वाहून गेली. तसेच भंगसाळ नदीत घातलेला बंधाराही वाहून गेलाय. यामुळे  या नदीचे पाणी पूर्ण गढूळ झाले आहे. एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबवून पाणी वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, दुसरीकडे दिलीप  बिल्डकाॅॅन सारख्या कंपन्या सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करत आहेत.  याचा त्रास मात्र, कुडाळ शहरातील सर्व सामान्य जनतेला भोगावा लागत आहे. हे पाणी दूषित झाल्यास याला जबाबदर कोण असा प्रश्न  नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.