आंबेगाव … आऊट ऑफ कव्हरेज …!

0
778

सावंतवाडी : मोबाईलमुळे जग जवळ  येतंय. हल्ली निवडणूकीतही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मोबाईल हेच एकमेव माध्यम आहे. मात्र सावंतवाडी तालुक्यातला कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आंबेगाव विभाग मोबाईल नेटवर्क नसल्याने जगाच्या संपर्कात नाही. या विभागातल्या नागरिकांची ही सध्याची एकमेव मागणी असूनही सर्वच लोकप्रतिनिधींनी याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलंय. आगामी निवडणुकीपूर्वी या भागात मोबाईल टॅावर न झाल्यास आंबेगाव आणि परिसरातील आठ वाड्या मतदानावर बहिष्कार टाकतील, असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. 

     कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातील आंबेगाव विभाग राजकीयदृष्ट्या जागृत समजाला जातो. या विभागातल्या मतदारांनी ठरवलं तर ते कोणत्याही उमेदावाराला जिंकू किंवा पाडू शकतात. मात्र हा विभाग गेल्या कित्येक वर्षापासून जगाच्या संपर्कात नाही. या विभागात कुणकेरी, कोलगाव, व कारीवडे इथ मोबाईल टॅावर झाले, मात्र आंबेगावला प्रत्येकवेळी वगळण्यात आले. भौगोलिकदृष्ट्या विचार करता आंबेगाव हे तुलनेने उंचीवर असणारे गाव आहे. इथे टॅावर  झाल्यास माणगाव ते आंबोली आणि सावंतवाडी ते मोरेपर्यंत नेटवर्क मिळू शकते. मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आजवर आंबेगाव आणि परिसरातील ग्रामस्थांवर सातत्याने अन्याय होत गेला. आगामी निवडणुकीपूर्वी या मागणीच्या गांभीर्याने विचार करून मोबाईल टॅावर  न झाल्यास येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.  

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.