भाजपच्या अपंग कार्यकर्त्याला आमदार नितेश राणेंनी दिला आधार

0
830

कणकवली : तालुक्यातील हुंबरटचे बुथ प्रमुख भाजप कार्यकर्ते दोन्ही पायाने अपंग असणाऱ्या दीपक दळवी याच्या जीवनात आमदार नितेश राणे यांनी आधार दिला आहे. कणकवली तालुक्यातील हुंबरट येथील गरीब कुटुंबातील दोन्ही पायाने अपंग असणारे दिपक दळवी यांना समाज कारणांची आवड असल्याने ते नेहमी धडपडत असायचे यातच आपण दोन्ही पायाने अपंग असल्याने काय वेदना होतात याचा अनुभव असल्याने ते फक्त हे आपले दु:ख न कवटाळत बसत इतरांना मदत करण्याची तयारी दर्शविली.यातच गेली पाच वर्षे कणकवली सारख्या शहरात राहून शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य नागरिकांना मदत, अपंग दाखला कसा काढवा यानंतर याचा कोणत्या योजनेतून लाभ घेतला जाईल याची सविस्तर माहिती अपंग बांधवांना देत त्यांना सदैव मदतीसाठी तत्पर असतात. गेली पाच सहा वर्षे दिपक दळवी भारतीय जनता पक्षाचे हुंबरट बुथ प्रमुख म्हणून काम पाहात आहेत. अनेकांना रात्री अपरात्री मदत असो वा कधीही धाव घेऊन कणकवली अथवा इतर ठिकाणी ये जा करण्यासाठी एस.टी अथवा इतर वाहनांच्या सहाय्याने नेहमीच जात असायचे यावर त्याना त्रासही जाणवायचा यासाठी तीन वर्षापूर्वी समाजकल्याण विभागाच्या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अपंग व्यक्तींना दुचाकी वाहन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता.याबाबत गेली चाडेचार वर्षे तो ज्या पक्षाचे नि:स्वार्थ काम करायचा त्या पक्षाच्या नेत्यांनी साधी दखलही घेतली नाही. यानंतर त्यानी ही हकिकत त्याचे मित्र असणारे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कणकवली तालुका सरचिटणीस संजय नकाशे याच्याकडे कैफियत मांडली. यावेळी संजय नकाशे यानी याबाबत माहिती आमदार नितेश राणे याच्याकडे नेले असता तुला येत्या गुढीपाडवा पर्यंत दुचाकी मिळेल असा शब्द दिला व सबंधित अधिकारी याच्याशी चर्चा करून प्रकरण मार्गी लावण्यासाठी सांगितले.यानंतर याबाबत माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जि.प.अध्यक्षा संजना सावंत, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव,जि.प.सदस्या श्रेया सावंत, संदिप सावंत, संजय हिर्लेकर यानी यशस्वी पाठपुरावा करत तो कोणत्या पक्षाचा आहे हे न पाहता निधी मंजूर करून दिपक दळवी याना दुचाकी मिळवून दिली. आज गुढीपाडव्याच्या दिवशी दिपक दळवी या गाडीची चावी घेताना त्याच्या चेहर्‍यावरील भाव आपसूकच दिसत होते. यावेळी सर्वाचे आभार मानत त्याचे आनंद अश्रू अनावर झाले.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.