गजाल कोकणातल्या राजकारण्यांची ; निवडणुकीच्या आखाड्याची

0
750

सावंतवाडी : कोकणात सध्या लोकसभेचा वातावरण चांगलाच तापत चललासा. राजकारण्याच्यो एकमेकार आरोप प्रत्यारोपाचे फैरी उडूक लागलेत. तर बघाया ही कोकणच्या राजकारण्यांची गजाल आयकलात मा गावावाल्यानू लोकसभेचे निवडणूक लागली हा. बांद्या पासून थय चिपळूनापर्यंत असो खूप मोठो रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघ पसारलो  आसा. गेल्या पाच वर्षात कोणी खैय आणि कशे उडये मारल्यानी ता हल्ल्या लोकांनी बगला आसा. तसा बघूक गेला तर कोकण म्हणजे शिवसेनेचे बाले किल्लोच, पण राणेनी शिवसेना सोडल्या पासून हैय शिवसेनेक खिंडार पडला. नंतरच्या काळात राणेनी काँग्रेसाकय राम राम करत स्वतःचो स्वाभिमान पक्ष काडलो. त्यामुळे आता कोकणात शिवसेना आणि राणेंचो स्वाभिमान अशीच लढत बगूक मिळत असा. शिवसेनेचो खासदार विनायक राऊत गेली पाच वर्षां हैय खासदार आसा. तर राणेंचो थोरलो झिल निलेश राणे हयो पाच वर्षा पूर्वी खासदार होतो. तसा बघूक गेला तर ह्या मतदारसंघात बॅ. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभु अशा विद्वांनांचो वारसो आसा, यांचो वरसो पुढे चलवक, कोकणचो कॅलिफोर्निया करूंक आम्ही पाच वर्षांपूर्वी हेंका दिल्लीत पाठला. पण हे थैय ईडली आणि वड्यार बोलनं इले. आता परत सेनेभाजप कडसून विनायक राऊत रिंगणात आसत .पण नाणारच्या विषया वरसून हैय सेना भाजपमध्येच तू तू मै मै सुरू असाच, भाजपचे पुढारी काय मनानं युतीत नाय आसत जे आसत ते युती धर्म पाळूक. एकमेकाचे रुसवे फुगवे काडुक हेंचे दिवस जातसत. तर थय काँग्रेस वाल्यांचा बगूक गेला तर ईजा बीजा आणि…. अशी परिस्थिती आसा. काँग्रेस राष्ट्रवादी कडसून नवीनचंद्र बांदिवडेकर उभे आसत. तर नारायण राणेंच्या स्वाभिमान कडसून राणेंचो झिल माजी खासदार निलेश राणे उभो आसा. तर थोडे थोडके नाय एकूण १३ उमदेवार हयन उभे असत. त्यामुळे खरी लढत ही राणे राऊत ह्याच्यातच जातली. आता हयली लोका फ्रिजाक मता घालतं ? की धनुष्यबाणाक !, काय आपला कॉंग्रेसचो हात धरतत या येणाऱ्या काळात काळातलाच.  मागच्या पाच वर्षांचो विचार केलो तर कोकणी लोकांनी राणेंका बाजूक सारून राउतांका पाच वर्षा संधी दिल्यानी . कणकवलीत राणेचो धाकटो झिल नितेश सोडलो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेचेच आमदार होते. पण मागच्या पाच वर्षात तसा काय मना सारख्या नाय ओ होवक .राणेंनी हाडलेल्या प्रकल्पाका गती येवकचं नाय. सी वर्ल्ड  सारखे असे भरपुर प्रकल्प अजून धूळ खातसत. चिपीत दोन विमाना ईली आणि आता तीसरा जाहीर सभेतचं उडतासा. भाजप वाल्यानी हाडलेल्या रिफायनरी सगळयांनी विरोध केलो . पण विकासाचं काय ता कोणाचं बोलणा नाय. त्याच्यामुळे हयले  हडगी भरून झिलगे गावातच पडले तर थोडे मुमयक गेले. तेंच्यात आता मच्छिमारांचो , बेरोजगारांचो , आरोग्यचो , शिक्षणचो असे प्रश्न आजय प्रश्नाच म्हणणं आसत . त्यामुळे हे प्रश्न कोण सोडयत, जेचो जाहीरनामो ह्या प्रश्नांबद्दल बोलात तोच आता दिल्लीत जातलो. त्यामुळे गावल्याने मतदानचो हक्क बजावा आणि योग्य माणसानं दिल्लीक पठाया. बा देवा महाराजा बारा गावाच्या बारा वेशीच्या बारा वहिवाटीच्या महाराच्या आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात्सून तेरा उमेदवार उभे रावलेसत महाराजा कोकणाचो इकास करुक येणाऱ्या २३ तारकेक कोकणी जनतेन बरोसो नेतो निवडून  देव दे महाराचा….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here