तारामुंबरी येथे मच्छीमार नौका बुडाली, खलाशी सुखरूप

0
443
देवगड : तारामुंबरी येथील भीमा पांडुरंग सारंग सकाळी पाच वाजता मच्छिमारी करण्यासाठी समज देवगड समुद्रात गेले होते परतीच्या वेळी सकाळी दहाच्या सुमारास देवगड तारामुंबरी नसतया ठिकाणी अचानक आलेल्या लाटेने त्यांची नाव का बाहेर फेकली गेली होती बुडाली यामध्ये नौकेचे सुमारे ७० ते ८० हजारांचे नुकसान झाले असून वरील तिन्ही खलाशांना बाहेर काढण्यात मच्छीमार आणि यश आले आहे. तारामुंबरी येथील भिवा सारंग हे आपल्या मालकीची IND-MH-5 MM-3277 जयवंती २  ही बोर्ड घेऊन पहाटे पाच वाजता मच्छीमारीसाठी गेले होते मच्छी पकडून झाल्यानंतर ते पुन्हा माघारी फिरत असताना सकाळी साडेनऊ ते दहा च्या दरम्यान देवगड तारामुंबरी समुद्र नस्त या ठिकाणी वाळूची लाट (चोरटी झाळ) आली यामध्ये त्यांची नौका बाहेर फेकली गेल्याने ती बुडाली या नौकेवर किरण केरकर ,गणेश निकम, रुपेश लाड असे तीन खलाशी होते नौका बुडाल्याचे समजताच तेथील स्थानिक मच्छीमार बांधवांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेऊन त्यांना वाचविले यात या झालेल्या दुर्घटनेत नौकेवरील इंजिन बिघडल्याने तसेच झाळी फाटल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हरेश्वर खवळे सुमित हरम, विलास नावगे याचे सहित अन्य स्थानिक मच्छीमार बांधवांनी खलाशी यांना सुखरूप बाहेर काढत नौका किनाऱ्यावर आणली. देवगड तालुक्यात मच्छिमार समाज मोठ्या प्रमाणात आहे पण समुद्रात  मच्छीमारीसाठी जाण्याकरता जो नस्त आहे.  त्याच्या मुखाशी प्रचंड वाळूच्या गाळ आल्याने मच्छीमारांना मच्छीमारीसाठी जातेवेळी खूप मोठी कसरत करावी लागते याकडे प्रशासनाचे मात्र आतापर्यंत पूर्णतः डोळेझाक केल्याने मच्छीमारांना अनेक वेळा अशा अपघातांना सामोरे जावे लागते याचा शासन स्तरावर गांभीर्याने विचार होणे अपेक्षित आहे असे येथील मच्छीमारांनी सांगितले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.