श्रीलंकेमध्ये साखळी बॉम्बस्फोट; मोठी जीवितहानी

0
510
नवी दिल्ली : श्रीलंकेची राजधानी कोलंबो बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. या स्फोटांमध्ये १२९ जण ठार तर ३०० हून अधिक जण जखमी आहेत. यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. यातील ३ बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर ३ बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये करण्यात आले. अजूनपर्यंत या स्फोटांची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी सुरक्षेसंबंधीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली आहे. साखळी बॉम्बस्फोट मालिकेनंतर मी कोलंबोतील भारतीय उच्च-आयुक्तांच्या सातत्याने संपर्कात असून भारत श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवत असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगिलते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here