उष्माघातामुळे हापूस आंब्याचे नुकसान ; नुकसान भरपाईची मागणी

0
425
वेंगुर्ले : गेले आठ दिवस पडलेल्या भयंकर उष्म्यामुळे आंबे गळून पडत आहेत. यामुळे आंबा बागायतदार शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत सर्व्हे करून, पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वेंगुर्ला तालुका आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच आंबा पिकास चांगले वातावरण नसल्यामुळे व कमी उत्पन्न आल्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी चिंतेत आहे.  त्यातच १९ व २० एप्रिल पासून तापमानात वाढ झाल्यामुळे, उष्माघात होऊन आंबा भरपूर प्रमाणात गळून पडला आहे. त्यात शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पडलेल्या आंब्याला फळमाशी लागल्यामुळे शिल्लक राहिलेल्या आंब्याला फळमाशीच्या उपद्रव वाढला असून शेतकऱ्यांचे तिहेरी स्वरूपात नुकसान झाले आहे.  यामुळे शासनाने लवकरात लवकर याची दखल घेऊन कृषी विभागाने संपूर्ण जिल्ह्याचा सर्व्हे करावा व पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे बी. एन. सावंत यांच्याशी चर्चा केली. यावेळी पंचायत समिती माजी उपसभापती बाळू परब, भाजपा तालुकाध्यक्ष बाळू देसाई, आत्मा कमिटी अध्यक्ष संतोष शेटकर, आबा बागायतदार शेतकरी दाजी परब, हेमा गावस्कर, प्रताप गावस्कर, कृष्णा राय, रामचंद्र परब, दिगंबर शेटकर, दादा सावळ, मकरंद परब, कृष्णा राऊळ, भूषण आरोस्कर, निवृत्ती परब, प्रवीण परब यांच्यासहित इतर शेतकरी उपस्थित होते.

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.