राधाकृष्ण संगीत साधनाच्या सवेश नाट्यगीत गायन स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद

0
499
सावंतवाडी : श्री राधाकृष्ण संगीत साधना आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सवेश नाट्य गीत गायन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री राधाकृष्ण संगीत साधना आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सवेश नाट्य गीत गायन स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उद्घाटन अनघा गोगटे यांनी केली.  सवेश नाट्य गीत गायन स्पर्धेत स्पर्धकांनी एका पेक्षा एक सरस सादरीकरणानी उपस्थितांची मन जिंकली. यामध्ये छोटया गटात ममता प्रभू प्रथम, देवयानी केसरकर द्वितीय, विधिता केंकरे तृतीय, कौस्तुभ धुरी,  निधी जोशी या उत्तेजनार्थ क्रमांकाच्या मानकरी ठरल्या. तर मोठ्या गटात ज्ञानेश्वरी चिंदरकर प्रथम, हर्षद मेस्त्री द्वितीय, संपदा खोबरेकर तृतीय, स्वरदा पणशीकर, प्रिया चिपकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकवला. सवेश नाट्य गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी सुप्रिया वाडकर, विलासानद मठकर, चारुदत्त शेणाई, बुवा कृष्णा राऊळ, सतीश रोजवलकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चीफ सागर चव्हाण, भाऊ साळगावकर, स्वप्नील गोरे, सतीश सेजवलकर, अमित मेस्त्री, प्रसाद मेस्त्री, गोविंद मराठे,  राधाकृष्ण संगीत साधनाच्या संचालिका विणा दळवी, अण्णा झाट्ये आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर पणशीकर यांनी केल.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.