कलमठ येथील सुनिल चिंदरकर यांचे निधन

0
481

कणकवली :कलमठ गावडेवाडी येथील सुनिल सदाशिव चिंदरकर (वय ३२) यांचे बुधवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले़ गेले पंधरा दिवस रक्तप्रवाहातील अडचणींमुळे गंभीर आजारी ते पडले होते़ त्यांच्यावर कोल्हापूर येथील संतोष प्रभू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते़ उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली़ कलमठ गावडेवाडी येथील श्री देव लिंगेश्वर मंदिर उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता़ कलमठ गावातील सांस्कृतिक, सामाजिक कार्यात सुनिल चिंदरकर यांचा पुढाकार असायचा़ त्यामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता़ त्यांच्या मृतदेहावर गुरूवारी सकाळी १० वा़ शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़ अंत्यसंस्कारासाठी राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली होती़ त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, काका असा परिवार आहे़ बँक आॅफ इंडिया शाखा कणकवली येथील कॅशियर रमेश चिंदरकर यांचे ते पुतण्या होत़ त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे़

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.