श्री गांगेश्वर मंदिर वर्धापन दिन सोहळ्यातील कार्यक्रमांस रसिकांचा उदंड प्रतिसाद

0
706
कणकवली : कणकवलीत श्री गांगेश्वर मंदिर तळेरे प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचा बुधवारी शुभारंभ झाला. यानिमीत्त ९ मे रोजी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आलय.या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कणकवलीत श्री गांगेश्वर मंदिर तळेरे प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचा बुधवारी शुभारंभ झाला. यानिमीत्त ९ मे रोजी विविध कार्यक्रमांच आयोजन करण्यात आल होत. सकाळी विविध धार्मिक विधी, महाआरती, महाप्रसाद पार पडला. सायं. श्री सद्भक्ती प्रसादिक भजन मंडळ मुंबईचे सुभाष वराडकर यांचे सुश्राव्य भजन संपन्न झाले. त्यांना साथसंगत गोपाळ नालंग, दिलीप पाटकर यांनी केली. पंडित बाळासाहेब वाईकर व अजित गोसावी यांची भक्तीसंगीताची जुगलबंदी हे या सोहळ्याच विशेष आकर्षण ठरल.  त्यांना पखवाज साथ गणेश सावंत, तबला दर्शन घाडी, अंकिता घाडी यांनी केली. रात्री विनोदी अभिनेते आशिष पवार, सिनेअभिनेते संजय खापरे यांच्या गलतीसे मिस्टेक या २ अंकी धम्माल विनोदी नाटकान उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमातील कलाकार मंडळींचा श्री गांगेश्वर मंदिर तळेरेच्यावतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.