कुडाळ येथील नेरूरकर ज्वेलर्स शोरूमला माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची सपत्निक भेट

0
1302
कुडाळ :मालवणसह मुंबईतही विनम्र सेवेने सदैव ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले नाविन्यपूर्ण दागिन्यांचे एकमेव शोरूम म्हणजे मेसर्स राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्स. याच ग्राहकांच्या आणि हितचिंतकांच्या विश्वासाच्या जोरावर मेसर्स राजाराम बाबुराव नेरूरकर ज्वेलर्स अॅण्ड सन्स हे यांनी आपल्या आपला तिसरा शोरुम कुडाळ येथे सुरु केला. या शोरूमला माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी सपत्निक भेट दिली. मालवण बाजार पेठेत राजाराम बाबुराव नेरुरकर यांनी १९१४ साली मेसर्स राजाराम बाबुराव नेरुरकर ज्वेलर्स या नावाने सुवर्णपेढी सुरु केली. याठिकाणी चोख सोन्याचे दागिने बनवून दिले जात असल्याने अल्पावधीतच महाराष्ट्रातील सुवर्णपेढ्यांमध्ये नेरुरकर ज्वेलर्स यांचे नाव अग्रक्रमी पोहोचले. दर्जेदार सुवर्णपेढ्यांमध्ये नेरुरकर ज्वेलर्स सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. ग्राहकांच्या याच विश्वासाच्या जोरावर कुडाळ शहरात मंगळवारी तिसऱ्या शोरूमच कुडाळ लक्ष्मी टॉवर येथे मोठ्या थाटात उदघाटन करण्यात आलं. या शोरूमला  माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी सपत्निक भेट दिली. तसेच सौ. नीलमताई राणे यांनी काही दागिन्यांची खरेदीही केली. तसेच नेरुरकर ज्वेलर्सला शुभेच्छा दिल्या.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.