ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला पर्यटकाकडून मारहाण

0
396

कणकवली : कारचालकाने सीट बेल्ट न लावल्यामुळे महामार्ग वाहतूक पोलिसांनी कार थांबवली असता कारमधील पर्यटक युवकाने वाहतूक पोलिसाला मारहाण करत जखमी केले. मुंबई गोवा महामार्गावर ओसरगाव येथील नियोजित टोलनाक्यावर वाहतूक नियम न पाळणाऱ्या वाहचालकांवर महामार्ग वाहतूक पोलीस कारवाईसाठी गाड्या थांबवतात. वाहन चालकाने सीट बेल्ट न लावल्यामुळे ऑन ड्युटी महामार्ग वाहतूक पोलिसांनी गोव्याहून मुंबईला जाणारी मारुती ए स्टार कार थांबवली . या कारमधून नवी मुंबई सानपाडा येथे राहणारे शेट्टी कुटुंबीय गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होते. मूळ कर्नाटकातील असणारे सुधाकर शेट्टी हे आपली पत्नी मुलांसह आपल्या गावी बेळगाव मार्गे उडपी येथे गेले होते. उडपीहून येताना गोवा फिरून शेट्टी कुटुंबीय जात होते. 19 मे रोजी शेट्टी कुटुंबीय मारुती ए स्टार कार क्रमांक MH 43 AB 5398 मधून सायंकाळी सव्वापाच च्या सुमारास ओसरगाव येथील नियोजित टोल नाक्याजवळ आले. चालकाने सीट बेल्ट न लावल्यामुळे शेट्टी यांची कार वाहतुक पोलिसांनी अडवली.मात्र पोलिसांनी कार थांबवल्यचा कारमधील पर्यटक युवकाला राग आला. कारमधील ओंकार सुधाकर शेट्टी या 21 वर्षीय युवकाने ऑन ड्युटी वाहतूक पोलिसांशी हुज्जत घातली. वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र विजय जाधव यांच्या नाकातोंडावर मारहाण केली. कॉन्स्टेबल देवेंद्रला नखाने ओरबाडत शिवीगाळही केली. कॉन्स्टेबल देवेंद्र च्या वर्दीला हात घालत खांद्यावरील महाराष्ट्र पोलीस बॅच लिहिलेला लुप्सही तोडला. याबाबत कॉन्स्टेबल देवेंद्र याने कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ओंकारवर शासकीय कामात अडथळा निर्माण करून शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.