सावंतवाडी पंचायत समिती समोर निवृत्त शिक्षकाचे उपोषण

0
755

सावंतवाडी : जिल्हा सेवा निवृत्त शिक्षक असोसिएशन सावंतवाडी पंचायत समिती समोर आज उपोषण छेडले.संगणक अहर्ता प्रमाणपत्र विहित मुदतीत न केल्यामुळे शिक्षका कडून केली जात असलेली वसुली थांबवून ही वसुली करू नये,तसेच ज्या शिक्षकाकडून वसुली करून घेतली आहे ती परत खात्यावर जमा करावी या प्रमुख मागण्या साठी उपोषण पुकारले होते.या आपल्या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करत न्यायालयातही जाऊ असा उपोषण कर्त्यांनी प्रशासनाला दिला.यावेळी दत्ताराम फटनाईक,दिवाकर सावंत भोसले,अर्जुन कलगुटकर,जयमाला सावंत,गीता तळणकर,योगिता गावडे,अशोक धर्णे तसेच इतर निवृत्त शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.