…अन्यथा योग्य ती भूमिका घेऊ : जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई यांचा इशारा

0
452

कुडाळ : गेल्या दोन वर्षा पासुन कुडाळ भंगसाळ नदीवर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत असल्यामुळेच कुडाळ शहराबरोबर आजूबाजूच्या गावांना पाणीटंचाईची झळ पोहोचली आहे. आता मात्र येत्या काही दिवसाता बंधाऱ्याचे काम पूर्ण न झाल्यास आम्ही योग्य ती भूमिका घेऊ असा इशारा संबंधित विभागाला जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी या बंधार्‍याची पाहणी दरम्यान बोलताना दिली.कुडाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भंगसाळ नदीवर असलेला जुना बंधारा पाडून त्या ठिकाणी नव्याने बंधारा बांधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र गेली दोन वर्ष पुर्ण झाले तर या बंधाऱ्याचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून ते अत्यंत धिम्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे कुडाळ शहराबरोबरच या परिसरातील आजूबाजूच्या गावांना तीव्र पाणीटंचाईची झळ पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे. यंदाही हे काम अत्यंत धीम्या पद्धतीने सुरू असल्याने या वर्षी पण या बंधाऱ्याचे काम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता वाटत आहे.मंगळवारी सकाळी या बंधा-याच्या कामाची पाहणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष सायली मांजरेकर, बांधकाम सभापती सरोज जाधव, महिला व बालकल्याण सभापती साक्षी सावंत, आरोग्य सभापती अश्विनी गावडे, नगरसेवक सुनील बांदेकर, अनंत धडाम यांनी या बंधाऱ्याच्या कामाची पाहणी करीत बंधाऱ्याच्या कामाची सुरू असलेली गती पाहून या कामाबाबत सर्वांनी नाराजी व्यक्त केली. या संदर्भात बोलताना रणजित देसाई यांनी सांगितले की भंगसाळ नदीमुंळे कुडाळ शहर आजुबाजुच्या गावात कधीही पाणीटंचाईची झळ पोहोचली नव्हती. मात्र आता या नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याचे काम हे गेली दोन वर्षे सुरू असुन तरी अद्यापही पूर्ण झाले नाही त्यामुंळे येथील पाणी साठा करता येत नसल्याने या पाणीटंचाईची झळ पोहचत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.