२० एप्रिल रोजी देशभरात उज्वला दिवस साजरा होणार

0
504
कणकवली : उज्वला गॅस योजनेत सध्या देशभरात साडेपाच कोटी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ हजार ४०३ लाभार्थी महिला आहेत. या योजनेत बदल करण्यात आले असून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे, त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ठिकाणी उज्वला गॅस कनेक्शन मेळावे २० एप्रिल रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत धुरमुक्त व्हावा हे पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न आहे. गृहिणींना चुलीतील धुरापासून मुक्ती मिळावी यासाठी उजवला गॅस योजना सुरू केली. उज्वला गॅस कनेक्शन योजनेत आमूलाग्र बदल करण्यात आले असून सुधारित उज्वला गॅस योजनेचा शुभारंभ २० एप्रिल रोजी देशभरासह सिंधुदुर्गात करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here