कंत्राटी कामगारांचे काम बंद आंदोलन मागे 

0
449

कुडाळ : कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने गेले दोन दिवस सुरू असलेले काम बंद आंदोलन अखेर गुरूवारी मागे घेण्यात आले. कंपनीने नेमलेल्या ठेकेदाराने कामगारांना कामाचे आदेश लेखी स्वरुपात दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान यावेळी कामगार नेते व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले की, यापुढे सुद्धा कंत्राटी कामगारांवर जर अन्याय झाला तर संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेच्यावतीने कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले होते यासंदर्भात मुख्य अभियंता रंजना पगारे, अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्यासोबत कुडाळ येथील अधीक्षक अभियंता कार्यालयांमध्ये हे कामगार नेते व  जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अशोक सावंत व कंत्राटी कामगार संघटनेचे सदस्यांनी चर्चा केली होती आणि यामध्ये जोपर्यंत ठेकेदार कामगारांना कामाचे लेखी आदेश देत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवणार आहोत गेले दोन दिवस हे आंदोलन सुरू असल्यामुळे अनेक अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीच्या कामाचा बोजवारा उडाला आहे अखेर विद्युत वितरण कंपनीला पाणी ठेकेदाराला कंत्राटी कामगारांना लेखी आदेश द्यावे लागले  हे लेखी आदेश प्राप्त झाल्यावर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सावंत यांनी सांगितले की हे यश कामगारांच्या एकजुटीचे आहे दोन दिवसानंतर कंत्राटी कामगारांना कामाचे आदेश मिळाले आहेत हे कामाचे आदेश महत्त्वाचे होते कारण जर काम करताना एखाद्या कंत्राटी कामगारांचा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण राहणार हा आमचा प्रश्न होता आता कामगारांना कामाचे लेखीत आदेश मिळाल्यामुळे हा प्रश्न सुटलेला आहे पण भविष्यात कंत्राटी कामगारांवर कोणताही अन्याय झाला तरी ही संघटना त्या कंत्राटी कामगारांच्या ठामपणे उभी राहणार असे त्यांनी यावेळी सांगितले आणि हे आंदोलन मागे घेत असल्याचे स्पष्ट केले. यावेळी कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड, संदीप बांदेकर, तुकाराम शिरोडकर, सिद्धेश सावंत, मोहन गावडे, विकास राऊळ, सर्वेश राऊळ, रामचंद्र राणे, विनोद बोभाटे, परशुराम ठाकूर, दीपक निवळे, तुषार गावडे, सुनिल परब, विनायक भोई, विठ्ठल साळकर, शैलेश हळदणकर, दिलीप गावडे, महेश राऊळ, संजय गोवेकर आदी कंत्राटी कामगार उपस्थित होते. 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.