आमदार नितेश राणेंच्या हस्ते ‘दाखला मित्र’ कक्षातून दाखल्यांचं वितरण 

0
619
कणकवली : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने दाखला मित्र कक्ष कणकवलीत स्थापन करण्यात आला. या कक्षाच्या माध्यमातून मिळालेल्या दाखल्यांचे वितरण आमदार नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.शैक्षणिक प्रवेश तसेच शासकीय योजनांच्या लाभासाठी  तहसीलदार किंवा प्रांत कार्यालयातील विविध दाखले आवश्यक असतात. जनतेला हे दाखले विनासायास मिळावे यासाठी २१ जून रोजी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने दाखला मित्र कक्ष कणकवली तहसीलदार कार्यालय गेटसमोर स्थापण्यात आला. या कक्षाच्या माध्यमातून १६० धिक दाखल्यांचा लाभ जनतेला मिळाला. आमदार नितेश राणे यांच्या हस्ते काही दाखल्यांचे वितरण करण्यात आले
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.