मिनी पर्ससीन आणि पारंपरिक मच्छिमारांची शासनाने गठीत करावी समिती

0
248

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यामध्ये मिनी पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास मान्यता द्यावी तसेच याबाबत मिनी पर्ससीन व पारंपरिक मच्छिमार यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य शासनाची समिती गठीत करून, सर्व मच्छिमार व्यवसायाचा योग्य तो सर्व्हे करून पारंपरिक व मिनी पर्ससीन च्या दोन्ही गटातील मच्छिमारांना त्या समितीमध्ये स्थान देऊन समान न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे रापण व मिनी पर्ससीन धारक मच्छिमार प्रतिनिधीनी दादा केळुसकर, अशोक सारंग, शाम सारंग, जनार्दन कुबल यांनी माजी आमदार राजन तेली यांच्या नेतृत्वाखाली मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकरयांच्याकडे मंगळवारी विधानभवन येथे भेट घेऊन केली आहे.वेंगुर्ला तालुक्यात मासेमारी हा मुख्य व्यवसाय असून तालुक्यातील पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या ८० ते ९० टक्के मच्छिमारांनी  मिनी पर्ससीन पद्धतीने मासेमारी करण्यास सुरुवात केली आहे. या मिनी पर्ससीन पद्धतीमुळे समुद्री पर्यावरणाचे कमीत कमी नुकसान होते. तसेच या पद्धतीमुळे मच्छिमारांच्या आर्थिक स्तर उंचावत आहे. वेंगुर्ला च्या समुद्रात मोठ्या प्रमाणात पोलन (चिंगुळ) व तारली मासळी ही ठराविक हंगामात थव्याने येते. ही मासळी आकाराने लहान असल्याने मेश साईजच्या मिनी पर्ससीन/ रिंगसीन जाळीच्या साहाय्याने पकडावी लागते. याशिवाय दुसरी पद्धत याठिकाणी उपलब्ध नसून ही पद्धत न अवलंबल्यास परप्रांतीय बोटींचा फायदा होतो. यामुळे वरील बाबींवर योग्य तो विचार करुन राज्य शासनाची समिती गाठीत करून पारंपरिक व मिनी पर्ससीन मच्छिमारांना समान न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.