संवेदनशील तरुणाईचा ‘खारीचा वाटा’, ४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

0
213
रत्नागिरी : तरुणाई म्हटली कि आपल्या डोळ्यासमोर येते फक्त मौजमजा. मात्र याला छेद दिला कोकणातील मुंबईस्थित तरुणांनी. खारीचा वाटा उपक्रम राबऊन कोकणातील तब्बल ४०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करत, या तरुणांनी युवापिढीसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आजची तरुणाई म्हटली कि आपल्या डोळ्यासमोर येतात पार्ट्या, मौजमजा आणि धिंगाणा. आजची तरुणपिढी फक्त स्वतच्याच विश्वात असते असे बोलले जाते. मात्र, याला अपवाद आहे ‘आभा’ संस्थेतील विद्यार्थी आणि तरुण कार्यकर्ते. कोकणातील अनेक शाळातील विद्यार्थी आजही शिक्षणासाठी संघर्ष करत आहेत. गुणवत्ता असूनही मुलभूत सुविधांपासून अनेक विद्यार्थी वंचित आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याच्या आभा संस्थेतील विद्यार्थी युवकांनी निश्यय केला. यातूनच साकारली ‘खारीचा वाटा’ संकल्पना’. आपला पाॅॅकेटमनी, स्वकमाई तसेच समाजातील दानशूर व्यक्तींकडून यासाठी पैसे गोळा केले. आणि याच पैशातून शैक्षणिक साहित्य खरेदी करून पोलादपूर, खेड तसेच महाडमधील शाळांतील गरीब विद्यार्थ्यांना दिले. पहिल्या वर्षी ११० , दुसऱ्या वर्षी २५० विद्यार्थ्याना केलेली मदत यावर्षी तब्बल ४०० विद्यार्थ्यांपर्यंत गेली. गेले वर्षभर  ही मुलं मुली यासाठी परिश्रम घेत होती. या उपक्रमासाठी आर्थिक मदत गोळा करत होती. याला प्रतिसादही चांगला मिळत होता. वाढदिवस, स्मृतिदिन यासाठी केला जाणारा खर्च आपोआपच या उपक्रमाकडे वळू लागला. आपल्या स्वकमाईतून केलेल्या मदतीचा आनंद, तसेच शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्याना झालेला आनंद पाहून तरुण कार्यकर्ते भारावून गेले. त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंद अशा अनेक गरीब, होतकरू विद्यार्थ्यांसाठी अजून काहीतरी करण्याच बळ देत होता. पुढील वर्षी १००० विद्यर्थ्यापर्यंत ही मदत पोहचवण्याचा संकल्प केला आहे. तसेच या विद्यार्थ्यांना वर्षभर विविध विषयांवर मार्गदर्शनहि करण्यात येणार आहे. फक्त साहित्य देऊन न थांबता या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे अक्षदा महाडिक आणि रुपेश सावंत यांनी सांगितले. हा उपक्रम तरुणाईसाठी एकआदर्शवत उपक्रम ठरत आहे.   देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे…घेणाऱ्याने घेता घेता…देणाऱ्याचे हातच घ्यावे…अगदी हाच वारसा मदत स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यानीही चालू ठेवावा ही माफक अपेक्षाही अनेक कार्यकर्त्यानी बोलून दाखवली.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here