देवगड – जामसंडे नगरपंचायत नगराध्यक्षपदी प्रणाली माने बिनविरोध  

0
346

देवगड : देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज प्रांताधिकारी चंद्रकांत मोहिते यांच्या उपस्थितीत झाली. विशेष सभेत ही निवड बिनविरोध करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी प्रणाली माने तर उपनगराध्यक्षपदी उमेश कनेरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे यांनी दिलेली बाबदारी आम्ही योग्य रीतीने सांभाळून पदाला न्याय देऊ असे प्रणाली माने आणि उमेश कनेरकर यांनी सांगीतले. तसेच आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून देवगड वासियांचे प्रश्न सोडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या निवडीनंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाळा खडपे, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संदीप साटम, ज्ञानेश्वर खवळे, महिला तालुकाध्यक्ष प्रीती वाडेकर, उष:कला केळूसकर, माजी नगराध्यक्ष प्रियंका साळसकर, माजी उपनगराध्यक्ष संजय तारकर, नगरसेविका हर्षा ठाकूर, प्राजक्ता घाडी, नगरसेवक, नगरसेविका, नगरपंचायत कर्मचारी, देवगड तालुका पत्रकार समिती, मच्छिमार संघटना, महिला संघटना यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.