प्राथमिक शिक्षकाची ग्रामस्थांशी उद्धट वर्तणूक; बदलीसाठी ग्रामस्थ आक्रमक

0
619
कणकवली : वरवडे नं १ शाळेतील शिक्षक प्रदीप मांजरेकर यांनी शाळा व्यवस्थापन बैठकीत ग्रामस्थांशी उद्धट वर्तणूक केल्याविरोधात वरवडे ग्रामस्थानी जि प सदस्यां स्वरूपा विखाळे, पं. स. सदस्यां राधिका सावंत यांच्यासह पंचायत समिती गाठत शिक्षक प्रदीप मांजरेकर यांच्या विरोधात  सभापती भाग्यलक्ष्मी साटम यांच्याकडे तक्रार मांडली. ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेत सभापती साटम यांनी तात्काळ प्रदीप मांजरेकर यांच्या कामगिरी बदलीस मंजुरी दिली. एका एनजीओ ने वरवडे नं १ शाळेस दिलेला संगणक मुझ्याध्यापकांनी स्वतःच्या घरी ठेवल्याची खोटी तक्रार अज्ञाताने शिक्षण विभागाकडे केली होती.यासंदर्भात १८एप्रिल रोजी वरवडे नं १ शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शिक्षक प्रदीप मांजरेकर व ग्रामस्थ तथा स्वाभिमान चे तालुका उपाध्यक्ष सोनू सावंत यांच्यात जोरदार वादंग झाला. शिक्षक प्रदीप मांजरेकर यांनी उद्धट वर्तणूक केल्यामुळे तात्काळ बदली करावी यासाठी ग्रामस्थानी सभापती साटम यांची भेट घेतली. यावेळी जि. प. सदस्यां स्वरूपा विखाळे, पं. स. सदस्यां राधिका सावंत, सोनू सावंत, माजी उपसभापती महेश गुरव, मंगेश घाडीगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.बीडीओ  मनोज भोसले, गटशिक्षणाधिकारी संदेश किंजवडेकर यांच्याशी चर्चा केल्यानंतर सभापती साटम यांनी शिक्षक मांजरेकर यांच्या कामगिरी बदलीस मंजुरी दिली.
ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.