वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदी संदीप पेडणेकर

0
407

वेंगुर्ले : दि.३ : (दिपेश परब): वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व तुळस गावचे माजी उपसरपंच, माजी सरपंच म्हणून काम केलेले संदीप पेडणेकर यांची वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे लेखी पत्र राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी दिले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या ध्येय धोरणानुसार पक्षाचे काम तळागाळापर्यंत पोहोचवून संघटना मजबूत करण्याची क्षमता आपल्यात असल्याने वेंगुर्ले तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदी आपली निवड करत असल्याचे या नियुक्तीपत्रात म्हटले आहे. राष्ट्रवादी पक्ष संघटना वाढविण्यासाठी दिलेली जबाबदारी आपण सध्या कार्यरत असलेल्या राष्ट्रवादीच्या मधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन करणार आहे तसेच वेंगुर्ले तालुक्यात राष्ट्रवादी संघटना भक्कम करणार आहे असे नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष संदीप पेडणेकर यांनी सांगितले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.