हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदीला बांधले…! 

0
35150

कणकवली : दि.०४ : आमदार नितेश राणे यांनी हायवे रस्ता पाहणी करताना हायवे अभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाची आंघोळ घालत गडनदी पुलाला बांधून घातले. हायवे सर्विस रोड तुझा बाप बांधणार का असा सवाल करत अनेक प्रश्नांचा भडीमार केला. आमदार नितेश राणे यांनी कणकवलीत दाखल होत हायवेच्या दुर्दशेची केली प्रत्यक्ष पाहणी केली. शहरातील पटवर्धन चौकापासून पहाणीला केली सुरवात केली. हायवे चौपदरीकरणादरम्यान शहरातील सर्विस रोडचे झालेले निकृष्ट काम, टूमलेली गटारे, रोड सेफ्टीकडे ठेकेदाराने केलेले कमालीचे दुर्लक्ष, सर्विस रोड वर असणारे चीखलाचे साम्राज्य याची स्वतः पायी चालत आमदार नितेश राणे यांनी  पाहणी केली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे , उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, बांधकाम सभापती संजय कामठेकर, महिला बालकल्याण सभापती मेघा  गांगण , स्वाभिमान युवा जिल्यध्यक्ष संदीप मेत्री, नगरसेवक अभी मुसळे, कविता राणे, किशोर राणे, राकेश राणे, विठ्ठल देसाई, संदीप नलावडे, गौतम कुडकर, राजन परब आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here