योगेश बेळणेकरांनी दाखवले कृष्णा धुरींना आसमान 

0
576
कुडाळ : दि. ०५ : (भरत केसरकर) : वाडोस ग्रुप ग्रामपंचायत  शिवसेनेचे उपसरपंच कृष्णा धुरी यांच्यावर आज अविश्वास ठराव दाखल झाला. ६ विरुद्ध ३  मतांनी ठराव संमत झाला. भाजपचे योगेश उर्फ भाई बेळणेकर परत उपसरपंचपदी विराजमान होण्याचा मार्ग सुकर झालाय. उपसरपंचाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अविश्वास ठराव संमत झाला. यावेळी दादा बेळणेकर, दीपक नारकर, मोहन सावंत, अशोक सावंत, रामचंद्र  सावंत, विशाल परब, भाई बेळणेकर, राजा धुरी, दिनेश सुभेदार, आंतोन फर्नाडिस, संजय सावंत, उपस्थित होते. आठ दिवसांनी उपसरपंच निवड होणार असून योगेश बेळणेकर यांनी पुन्हा एकदा कृष्णा धुरी यांना आसमान दाखवले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.