सिंधुदुर्ग बँके तुळसुली शाखेच्या चोरीतील आरोपी गजाआड

0
2496

कणकवली : दि ०७ : कुडाळ तालुक्यातील तुळसुली सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखेत चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चौकडीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या विशेष पथकाने चतुर्भुज केले.५ जुलै रोजी कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील सिंधुदुर्ग बँक शाखेत चोरीचा प्रयत्न झाला होता. सदर चोरीच्या तपासासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी एलसीबी चे विशेष पथक तयार केले होते. या पथकाने हिस्ट्रीसीटर गुन्हेगारांचा माग घेतला होता. त्यानुसार सोनू विठ्ठल सावंत ( रा.कुडाळ ), कृष्णा रविकांत शिंदे (रा.मूळदे ), लक्ष्मण गणपत नारिंगरेकर ( रा.नेरूर चव्हाटा ) यांच्यासहअन्य एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. संशयितांनी जिल्हा बँकेतील चोरीची कबुली दिली आहे. तसेच कुडाळ बाजारपेठ आणि मूळदे येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे.संशयितांकडू चोरीची वापरलेली गॅस कटर, गॅस, हातोडी, गुन्ह्यात वापरलेलं वाहने जप्त करण्यात आली आहेत. एसपी गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गोयल यांच्या आदेशानुसार एलसीबी पीआय प्रल्हाद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पीआय शंकर कोरे, एपीआय वनिता कुलकर्णी, उपनिरीक्षक रविराज फडणीस, उपनिरीक्षक शाहू देसाई, हवालदार गुरूनाथ कोयंडे, आशिष गंगावणे, पोलीस नाईक अनुप खंडे, कॉन्स्टेबल अमित पालकर, संकेत खाडये, उमेश सरमळकर, स्वप्नील तोरस्कर, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, दिव्या राणे यांनी कारवाई केली. पुढील तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे करत आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.