चीपी विमानतळावरील पाण्याचा प्रवाह बदल्यामुळे बागायतदारांचे नुकसान…!

0
276

कुडाळ : दि.०८ : चीपी विमानतळावरील पाण्याचा प्रवाह बदल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झालय. यासंदर्भात भाजपाच्यावतीने निवेदन देण्यात आल होत. याची दाखल घेत नुकसानीची पहाणी आय.आर.बी.चे अधिकारी लोणकर व अमर पाटील यांनी ग्रामस्थांना सोबत घेऊन करण्यात आली. यावेळी आय.आर.बी. कंपनीने विमानतळाचे बांधकाम करत असताना पुर्वांपार असलेल्या छोट्या नाल्यांचा मार्ग बंद करून एकाच नाल्यामध्ये पाणी सोडल्याने पाण्याच्या प्रवाहाने बागायतदारांचे नुकसान झाले. येत्या आठ दिवसात बंद केलेले छोटे नाले पुर्वव्रत करुन देण्याचे अभिवचन आय.आर.बी.कंपनीचे अधिकारी लोणकर यांनी ग्रामस्थांना दिले. भाजपा प्रदेश चिटनीस राजन तेली यांनी दूरध्वनी वरुन आय.आर.बी.च्या वरीष्ठ अधीकारयांबरोबर चर्चा करुन या प्रश्नी मार्ग काढला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसंन्ना देसाई, परुळे शक्ती केंद्र प्रमुख राजु दुधवडकर , बुथप्रमुख नितेश तुळसकर, बागायतदार योगेश सामंत, भिकाजी ऊर्फ तात्या पवार, दिपक दुधवडकर, कालिदास चिपकर, दिपक मळेकर, रोहीत मळेकर, निखिल करलकर, गोपाळ मळेकर , जयेश दुधवडकर, तुषार राऊळ तसेच कर्ली येथील ग्रामस्थ उपस्थित होते .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.